प्रेम काय आहे हेच मुळातले कोड्डे सुटत नाही
प्रेम आणि प्रेम खूपस नाही पण थोडंतरी प्रयत्न केला
पण कधी उलघाडलेच नाही उलट गुंता वाडताच गेला...
प्रेमामध्ये हातात हात घालून भटकावे
प्रेमामध्ये एक मेकाच्या मिठीत जग विसरावे
प्रेमामध्ये रुसवे-फुगवे करावे
का कुणास ठाऊक जमतच नाही...
प्रेम म्हणजे फक्त एक मेकांना दिलेली सात
प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनाची समजूत
प्रेम म्हणजे न काळात केलेला विश्वास
का कुणास ठाऊक जमतच नाही...
कदाचित असे असावे लहानपानापासून कोरलेले विचार
कधी परक्या व्यक्तीला जवळ आणायचे नाही
जेवढे राहता येईल तेवढे लांब राहाचे
कदाचित म्हणूनच का...
माझे प्रेम मनातच राहते
आणि मन बोलते...
' नावासाठी प्रेम जमत नाही रे मित्रा... '
--वर्षा नाईक
Saturday, September 10, 2011
" नावासाठी प्रेम जमत नाही रे मित्रा... "
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment