एकटी असल्यावर विचार येतो
का म्हणून मी तुझ्यापाठी लागू
का म्हणून मी तुझी चौकशी करू
जर मी तुला आवडतच नाही
का म्हणून....
मनाला सावरू कि स्वतःला
आज पूर्ण हरून बसले आहे
खूप प्रयतन केले पण...
कुठे तरी मीच कमी आहे
खोठ हि नाकारलेल्यातच असते
कितीही केलेतरी नकार न मानान्यातले नव्हे
पण एवढे असतानाही का म्हणून
का म्हणून मीच आठवण काढायची
तुला येत नाही का
तुला माझे नाव तरी आठवते का रे ?
तू खूप बदला आहेस...
वेळ असते प्रत्येकाची
आज तुझी आहे
म्हणून तुझे हृदयाचे दार बंद आहे
उद्या कदाचित माझी असेल
पण तोवर दुसरा कोणी...
मनजरी गुंतले असेल तुझ्यात
तरी
चित्त आहे जागेवर जे ठरवेल
काय चुकले आणि काय बरोबर
कवी नसतानाही खूप काही लिहुन गेले मी...
पण आज जाणवले
लेखणी खूप जड होते हृदय मांडताना...
पण एवढे असलेतरी...
मी माझे मी पण जपणार आहे
कारण सर्वाना माझे हास्य आवडते
आणि मी तुझ्यामुळे सर्वांना...
दुखावणार नाही....
-- वर्षा नाईक
Monday, September 19, 2011
मी आणि माझे मी पण...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment