Wednesday, September 21, 2011

मी जगतेतर आहे...

आज अचानक विचित्र विचार आला
आज असे काही उलगडले ज्याचा विचार...
का आला... ??

नक्की प्रेमच आहे का माझे ?
नक्की काय आहे ?

प्रेम ज्याला म्हणतात तेच आहे का .. ?
प्रेम ज्यामुळे सर्वे चित्त विखरते
पण असा विचार का यावा..

मला तू आवडतोस हे नक्की
तुझ्याबरोबर वेळ कसा जातो समजत नाही
अजून थोडावेळ थांब असे तू कधीच बोला नाही

बोलून बोलून शब्द कमी पडले
पण कधी नजरेला नजर भिढलीच नाही
एकत्र चालो पण तू कधीच हात धरलाच नाही

मित्रान बरोबर असताना चोर नजरेने पाहणे
मी कोणकोणाबरोबर बोलते-हसते हे चोरून पाहणे
मी पाहिले तर नजर चुकवतोस ...

का कुणास ठाऊक आज मला प्रश्न पडला...
जरी तुला आवडत नसतानाही मला तू आवडलास
त्या आवडीला प्रेम बोले तर तू रागवलास...

तुझ्या रागाला घाबरून मन अगदी...
मन अगदी कोमेजून गेले

तू नाही बोला असतानाही
तुझ्या आठवणीतून
तुझ्यावर प्रेम केले...

म्हणूनच का आज हा विचार आला
मला नक्की तू आवडतोस
कि
मी नक्की प्रेम केले

कारण तुझ्या सहवासाशिवाय ...
मी जगतेतर आहे...

-- वर्षा नाईक
(असे बोलतात कोणाचे रहसे बोलू नये पण माझ्या एका Friend ने मला तिची व्यथा सांगितली त्यावर हे सुचले....समाजानेवाले को इशारा काफी हैं ...)

No comments:

Post a Comment