Saturday, October 15, 2011

" माझिया प्रियाला प्रित कळेना "


प्रेम म्हणे नजरे नजरे मधला खेळ आहे
कधी खेळला आहे का ...?
कधी डोळ्यांनी बोलाचे नको आणि हो
कधी डोळ्यातले न दिसणारे पाणी
तर कधी आणि कधी...


बाकी काही समजो किंवा नको
पण डोळे सर्वे बोलून जातात
मन हे डोळ्यांन मध्ये दिसते
होकाराला नाकारत नाकारला होकारात
काही असो हृदयात आलेली कळ डोळ्यात उमलते...


नाही म्हणता म्हणता व्यक्ती आवडायला लागते
थांब म्हणत म्हणत व्यक्ती निघून जाते
प्रेमाची पायरी चडायला पहिला आणि शेवटचा हातभार लावतात
ते डोळे
खूप काही पाहतो खूप काही निभावतात...


पण मनात असलेली बैचैन डोळ्यात उलगडते
कधी न मिळणारे
कधी मिळाले तर पहिला डोळ्यातून पाणी येते
पाणी आणि डोळे
काहीतरी वेगळेच इतिहास आहे...


पण आज काही केल्या मला ते लाभतच नाहीत
नाही नाही म्हटले तर पाणी येताच नाही
जसे दुसकाल पडला आहे...
डोळे कोरडे झाले आहेत...
कारण जे मला दिसले ते कुणालाच दिसले नाही


त्याचे गालातले हसणे
त्याच्या तिरक्या नजरा
आणि त्याच्या डोळ्यातले प्रेम
का कुणास ठाऊक
जाताना बोलून गेला...' प्रित म्हणजे काय...'
म्हणूनच का उद्धागर निघतात मनातून ...' माझिया प्रियाला प्रित कळेना...'


--वर्षा नाईक

2 comments: