Saturday, October 1, 2011

"जग म्हणावे लागते..?"



जणू ते तान्हे बाल असो कि नव्वदीला गाठलेला तरुण
मरण दारावरून उमबर्यातून गळया जवळ आले
तरी जगायची इक्छा काय संपत नाही...

का जगावे हा प्रश्न कधी उलघडत नाही
जन्माला आलो म्हणून जगायचे
काहीही असो पण जगायचे हे नक्की...

आईबाबांच्या जगण्याला अर्थपूर्ण मुलांमुळे
मुलांच्या प्रत्येक स्वप्न पूर्तीमध्ये त्यांचे आयुष जाते
मुल आणि पाल्याचे गणित काही वेगळेच

आयुष्यात खूप चढ - उतार येतात
प्रश्न एवढाच राहतो त्यांना सामोरे कसे जायचे

आयुष्यात खूप अशा वाटा येतात
जेव्हा चुकले काय बरोबर किती
ह्यांचा गुणाकार भागाकार करून
बाकी येई परीयंत नव्वदीला घटतो...

पण एवढे सगळे होत असताना जग म्हणावे लागते का?
खूप सोपा प्रश्न आहे
सुटतो सुटतो बोले परीयंत गणितच बदलते...

पण गणित चुकले म्हणजे आयुष संपले
असे का?
पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा
जो वर बरोबर येत नही तो वर...

मग कधी कधी अशा वेळी म्हणावे
"जागून तर बघ पुढे किती सुंदर आयुष आहे..."

आयुषाचा खरा अर्थ कळतो तो त्या मुंगीवरून
काय तो ईवलासा जीव
सतत तिची ती खटपट ...

बोलायचे एवडेच
जन्माला आलो म्हणून सार्थक व्हावे
पण सार्थक करताना स्वप्नांना जगायला हवे...

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment