Saturday, December 3, 2011

"बोलतात त्यातलेच आहे..."


जगावे का मारावे हा प्रश्न नेहमीचा झाला आहे
सकाळ दुपार संद्याकाळ २४ तास जसे जड झाले आहेत
दुसर्याला बोलता बोलता
आता...
त्या डबक्यात स्वतःला पाहवत नाही आहे...
बोलतात त्यातलेच आहे...


कधी संपणार एकटेपणा जो जन्माला लागला आहे...
खूप दुर्लक्ष्य केले
कट्ट्यावर बसलेल्या जोड्यांना आणि त्यांच्या चाळ्यांना
केसांबरोबर खेळणे, हातात हात आणि ...
दुर्लक्ष्यजरी केले तरी...
जिकडे पाहावे तिकडे तेच
बोलतात त्यातलेच आहे


कधी काळी कविता वाचली होती..
" खूप मन भरते जेव्हा मी दुसर्या जोड्यांना पाहतो
का कुणास ठाऊक तुझी आठवण येते... "
असेच काहीतरी बोल होते...
पण आठवणीतला भाग नाही एकटेपणाचा भाग आहे
कोण समजावणार मनाला आणि ...
बोलतात त्यातलेच आहे


कधी होणार मला प्रेम
किवा
कधी भेटणार तू....
बोलतात त्यातलेच आहे....
मला पण कराचे आहे प्रेम बोलातातना त्यातलेच आहे...


-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment