Friday, August 9, 2013

तो श्वास जो 'स्व' साठी झगडला …


खरच हृदयकाडून जगता आले असते तर …
नसत्या त्या भानगडीत पडलच नसत…
खरच असे आहे का … ?
पहायला गेल तर स्मरणशक्ती हि मेंदूमध्ये आहे …
कोणाला जीवनातून काडायचेच आहे तर ते स्मरणशक्तीवर आहे …
हृदयकडून काय होणार ….
जसे कोणाचे अचानक निघून जाने हृदय सहन नाही करत …
तसे कदाचित मेंदूलासुधा सहन होत नाही …
तसे पहायला गेले तर सगळ्याच अवयवांना एकाचीच ओढ असते …
म्हणूनच का …
हृदयाला कळ येते …
हृदयातल्या कळा सहन नाही होत तर डोळ्यांना पाणी येते …
नाकातून शेबुड … कान सुन्न पडतो … त्वचेला कट्टा येतो आणि …
ओठ उघडतात …
जाणार्या व्यक्तीला आवाज द्यायला ….
आवाज जड होतो …
श्वास घेणे कठीण होतो …
पोटात गोल येतो आणि …
अंगावर एक थरकाप होतो …
जाणारी व्यक्ती जाणारच आहे …
अडवण्याचा प्रयत्न निष्प्रभ आहे …
मग त्या वेळी वाटत ….
बस झाल आता …
जीवनच संपले …
आणि …
जाणारा आत्मा घेवून गेला …
आणि
राहिलेला आहे तो श्वास जो 'स्व' साठी झगडला …

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment