Monday, November 4, 2013

येशील का कधी ….



जणू मृगजळ होत 
स्पष्ट अस्पष्ट असे अनुबंद 
नकळत कळत घडलेलं 
समज होत ते गैर झाल 
गैर झाल ते समजून झाल 
तुटत होत मन 
झुरत होता आत्मा 
कळत नाकळत समजून उमजून केलेलं असे नव्हे 
तरी सुधा आज जेव्हा हात निसटले  
जणू मनाच्या कोपऱ्यात एकच 
डोक्यात एकच
येशील का परत त्याचं आठवणी पुसून
नवीन आठवणी जुळवण्यासाठी 
येशील का कधी …. 
जुन्या आठवणी पुसण्यासाठी … 

वर्षा नाईक 

आठवणींच ओझं



कधी कधी न समजणाऱ्या वृतीने रहाव 
म्हणजे सगळ्यांना गोड वाटत 
कधी कधी विसरण्याचा प्रयत्न करावा 
म्हणजे विसरणारी गोष्ट कायम होते 
कधी कधी आयुष्यात एकदातरी नियम भंग करावा 
म्हणजे समजत नियम फक्त आपणच पाळतो 
कधी कधी आठवणीना पाणी द्यायचे 
म्हणजे डोळ्यातील पाणी डोकाऊन पाहत 
सर्व असे कि विसरणे कठीण 
आणि 
आयुष्यभर आठवणींच ओझं वाहत राहायचं … 

वर्षा नाईक 

एक प्रश्न …


गर्दीतील एकटेपणा 
आणि आठवणींचा पुंजका 
तो चुकून होणारा स्पर्श 
ती शब्दांची मांडणी 
ती नजरेची धडक 
एकमेकांना पाहन 
थोड मागे चालन
थोड पुढून मागे पाहन 
आज सगळ हरवलं असे नाही 
पण 
जिथे सात काही क्षणाचा आहे 
तिथे आयुष्याचा लळा किती योग्य आहे 
सांग ना किती योग्य आहे 


वर्षा  नाईक 

मन तुझ्यात रमल आहे …


मनभरून आठवणी दाटल्या आहेत 
का कुणास ठाऊक मन तुझ्यात रमल आहे … 
मनातील उभाल मांडावशी वाटते आहे 
का कुणास ठाऊक  मांडलेल आयुष्य संपत आहे … 
डोळ्यातील प्रश्न ओठांवर आला आहे 
का कुणास ठाऊक पोटात गोल आला आहे … 
ओठानचे हास्य जणू तुझ्या भोवतीच आहे 
का कुणास ठाऊक तूच हरवला आहे … 
हास्याच्या मागील दुख जणू डोकावत आहे 
का कुणास ठाऊक प्रयत्न निष्फळ आहे … 
दुखः आहे कि सुखं आहे सोबतीस 
कारण अजूनही मन तुझ्यात रमल आहे …  


वर्षा  नाईक 

निसटण्याची वेळ पहायची …


एक एक करून सगळे असे हातातून निसटत होत…
निसटनार्याला काय पकडायचा प्रयत्न करणार … 
प्रयत्न तर कसा … ?
सगळे असे बिखरल्यासारखं झाल… 
जाणारे जाणारच होते … 
बोलून कुठे थांबल असत … 
का अशी नशिबाची थठ्ठा … 
जर एक ना एक दिवस हात सुटणारच होते 
तर …   
काय म्हणून खेळ खेळावा … 
जर प्रत्येक वेळी सुरुवात पहिल्यापासून होणार असेल … 
जर प्रत्येक वेळी पापण्या ओलावल्या असतील … 
आणि 
जाणार्याला फक्त पाहत रहाच जो वर दिसेनासं होईल … 
का म्हणून कुणाला एवढ आपलास करायचं … 
आणि 
निसटण्याची वेळ पहायची … 



वर्षा नाईक 

Saturday, September 21, 2013

मैत्री म्हंटलकी चालत सगळ …


कधी कधी सगळ जग जिंकून जात तर कधी … 
काय ती थट्टा काय ते विनोद 
काय त्या आठवणी काय ती मस्ती 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
आज वर कधी कोणी असे वाईट समजले किवा बोल नाही … 
आज वर प्रत्येक जन नुसता नाव काढत … नुसता नाव … 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
प्रेम आणि प्रेमाचे अणुभंध मैत्री समोर कधी टिकलेच नाही 
प्रेम जे कधी उलघडले नाही तेवढ मैत्री ने शिकवलं 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
बस एकाच मनात खुपत राहत जे आहे ते तोंडावरच आहे … ??
कि मनापासून जपल आहे हे नात … 
बावळट बेशरम कमीने सगळ्या अश्या मंत्रांनी नावाजले जात … 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
बस त्या मैत्रीला आता वेळ नाही आपल्याशी सांगड घालायची … 
मैत्री आहे तिथेच बस आपण हरवून बसलो आहे स्पष्टत्व आणि गूढ मैत्रीच … 
जे कधी एखाद्या कट्ट्यावर किवा कॅन्टीनमध्ये रंगायचं 
ते आता इंटरनेटच्या जगात हरवलं आहे … 
बस काय मैत्री आता "wss up" आणि "status update" एवढीच राहिली आहे … 


--वर्षा  नाईक